'हे' आहेत यंदाच्या शांतता नोबेलचे मानकरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |



लंडन : डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालचा मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नादिया आणि मुकवेगे यांनी लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढताना जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळेच त्यांना शांतातेचा नोबेल जाहीर केला जात असल्याचे आयोजन कमिटीतर्फे सांगण्यात आले. डेनिस हे कांगो येथील तर नादिया या इराक येथील राहणार्‍या आहेत.

 

यंदा शांतता नोबेल पुरस्कारासाठी ३३१ जणांची नावे आली होती, त्यापैकी या दोघांची निवड झाली. डेनिस मुकवेगे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला असून लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अनेक स्त्रीयांना न्याय मिळवून दिला. तर नादिया मुराद यांना आयएस दहशदवाद्यांनी अपहरण करून अनेक वेळेस लैंगिक शोषण केले होते. यानंतर त्यांनी बहादुरी दाखवत त्या नरकयातनांमधून पळ काढला. त्यानंतर नादिया यांनी महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जगभरात जनजागृती करण्याचे काम केले.

  

२५ वर्षीय नादिया या शांतता नोबेलचा पुरस्कार मिळवणार्‍या दुसर्‍या तरुण महिला आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये मलाला युसुफजई यांना वयाच्या १७ व्या वर्षी शांततेचे नोबेल मिळाले होते. आतापर्यंत जगभरातील ९८ जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये नोबेलच्या एका कार्यक्रमात या दोघांना सन्मानित करण्यात येणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@