शिवशाही बसचा अपघात, १ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |


 

 

कोल्हापूर: पुणे-बेंगळूर महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या अपघातात वाहक ठार झाला असून १९ प्रवासी जखमी आहेत. ही बस पुण्याहून कुडाळला जात होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास किणी टोल नाक्याजवळ समोर असलेल्या ओमनी गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्यापासून बाजूला गेली.

 

मध्यरात्री अडीचच्या सुमारास किणी टोल नाक्याजवळ समोर असलेल्या ओमनी गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्यापासून बाजूला गेली. बस एका बाजूला उलटून हा अपघात झाला. यामध्ये सागर सुधाकर परब (वय ३० ता. कुडाळ) या वाहकाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या १९ जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये कुडाळ आणि पुणे येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@