शेअर बाजार ८०० अंकांनी कोसळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |

 
 
 

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर स्थिर ठेवल्याच्या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बंद होताना तब्बल ७९२ अंकांनी घसरला. दिवसअखेर तो ३४ हजार ३७६.९९ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८२.८० अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात ४.१९ लाख कोटींचे नुकसान झाले.

 
 कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, गुरुवारी रुपयाने गाठलेला नवा तळ, आणि आरबीआयच्या पतधोरण आढवा बैठकीत स्थिर ठेवण्यात आलेले व्याजदर याचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला. गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने ९५० अंकांनी सेन्सेक्स घसरला. बीएसईवर केवळ तीन शेअर चांगली कामगिरी करत होते. निफ्टीही २.२५ अंशांनी घसरून १० हजार ३१६ अंकांवर बंद झाला. मिडकॅप इंडेक्स २.५ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप इंडेक्स २ टक्के घसरला. ऑईल अँड गॅस, बँकिंग, मेटल, ऑटो, एफएमसीजी, पॉवर आदी क्षेत्रातील शेअर घसरले. टीसीएस, इन्फोसिस, इंडसआयएण्ड बॅंक आणि एचडीएफसी बॅंक आदी शेअर वधारले. त्यात एचपीसीएल, बीपीसीएल, ओएनजीसी, रिलायन्स, अदानी पोर्ट आदी शेअरमध्ये घसरण झाली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@