आरबीआयकडून व्याजदर ‘जैसे थे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली सहा सदस्यीय पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी संपली. तीन दिवस चालेल्या या बैठकीनंतर आयरबीआयने व्याजदर ६.५ टक्के कायम ठेवले आहेत. गेल्या दोन पतधोरण आढावा बैठकांच्या निर्णयानुसार पाव टक्का व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आश्चर्याचा धक्का देत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय आरबीआयने शुक्रवारी जाहिर केला.

 

आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये वाढते कच्च्या तेलाचे भाव आणि शेतमालाचा किमान हमीभाव आदी चिंतेचे विषय असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय समितीपैकी चार जणांनी व्याजदर वाढवू नयेत असा पवित्रा घेतला, तर सदस्य चेतन घाटे यांनी व्याजदर वाढवण्याच्या बाजूने कल दिला तर आणखी एक सदस्याने तटस्थ राहण्याचा पर्याय स्वीकारला. सप्टेंबरच्या तिमाहीत प्रस्तावित महागाई दर ४ टक्क्यांवर होता तर आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या उत्तरार्थात तो ३.९ टक्के ते ४.५ टक्के ठेवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत २०१९ या आर्थिक वर्षात तो ४.८ टक्के होता. आरबीआयने २०१९ या आर्थिक वर्षासाठी ७.४ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२० पर्यंत विकासदर ७.६ टक्क्यांवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

रुपयाची सर्वात खराब कामगिरी : कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रुपया दररोज नवा तळ गाठत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. शुक्रवारी रुपयाने प्रतिडॉलरमागे ७४ रुपये हा सर्वात निचांक गाठल्याचे म्हटले आहे. रुपयाचे पाच टक्के अवमुल्यन झाल्याचेही आरबीआयने जाहीर केले.

 

आरबीआयचे पाऊल स्वागतार्ह : अर्थतज्ज्ञांनी आरबीआयच्या आजच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्याच्या परिस्थितीतूनही भारतीय अर्थव्यवस्था सावरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येत्या आर्थिक वर्षात १ लाखांचे बॉण्ड खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वीच गेल्या आठवड्यात ३६ हजार कोटींचे बॉण्ड खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@