भारत रशियात एस-४०० खरेदी करार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |

४० हजार कोटीत भारत ५ मिसाईल खरेदी करणार



 
 

नवी दिल्ली : अमेरिकेचा दबाव झुगारुन भारताने रशियासोबत जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या अत्याधुनिक एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम विकत घेण्याचा करार केला आहे. ४० हजार कोटी रुपयांचा हा करार असून त्याबदल्यात भारताला अत्याधुनिक अशी एस-४०० रशियन प्रणाली मिळणार आहे. हैदराबाद येथे १९ व्या भारत-रशिया वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठकीत हा करार केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी या करारावर स्वाक्षरी करत गळाभेट घेतली.

 

ही अत्याधुनिक डिफेन्स मिसाईल सिस्टिम ३८० किलोमीटर परिसरातील जेट, ड्रोन तसेच इतर क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते. भारत अशी एकूण ५ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. तसेच रशियात नोवोसिबिर्स्क शहरात भारत मॉनिटरींग स्टेशन उभारणार आहे. हा करार केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावा लागेल अशी धमकी दिली होती. मात्र भारताने अमेरिकेचा दबाव झुगारत रशियासोबत हा करार केला. या करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशाचं राजकारण तापलं होते. अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी धडाडत होत्या. मात्र अखेर या करारावर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@