आता डिझेलही होणार ४ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |


 

नाशिक: गुरुवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल ५ रुपये स्वस्थ केल्यानंतर शुक्रवारी राज्य सरकारनेसुद्धा डिझेल ४ रुपयांनी स्वस्थ करणार असल्याचे सांगितले. इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून शुक्रवारी डिझेल ४ रुपयांनी स्वस्त करण्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

 

केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्यानंतर पेट्रोलचे दरही ५ रुपयांनी कमी केले. डिझेल संदर्भात निर्णयाची अंमलबजावणी होईल असे त्यांनी सांगितले. ऑइल कंपन्यांच्या दर नियंत्रणसंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करीत आहे. तरीही राज्य आणि केंद्र सरकारने आर्थिक बोजा सोसून इंधनावरील दर कमी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच इंधन दर कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय जीएसटी कौन्सिल ने घेणे अपेक्षित असून, जीएसटीत इंधनाचा समावेश केल्यास देशभरात एक सारखे दर होतील, असेही ते म्हणाले.

 

महाराष्ट्र पोलीस अकाडमीचा ११५वा दीक्षांत सोहळा शुक्रवारी सकाळी अकादमीच्या मैदानावर पार पडला यावेळी ८१९ प्रशिक्षित पोलिस उप निरिक्षक अधिकाऱ्यांची तुकडी पोलीस दलात सामील झाली प्रशिक्षणार्थीनी संचालन केले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री ग्रामीणचे दीपक केसरकर, शहरी विभागाचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@