दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |


 

 
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १ मार्च रोजी सुरू होणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर केले जाते.
  

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत असेल. दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@