शेअर बाजाराची लोळण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |


सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला

 

मुंबई : रुपया दररोज गाठत असलेला नवा तळ, जागतिक बाजारात वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर पाव टक्क्यांनी वाढण्याची भीती यांमुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतल्याने गुरुवारी सेन्सेक्स तब्बल ८००.४७ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५९ अंकांनी घसरुन १० हजार ५९९.२५ वर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या चौफेर विक्रीमुळे आयटी, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली तर मोठ्या शेअर्समध्ये रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचयुएल, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक आदी शेअर्समध्ये सहा टक्के घसरण झाली.

 

रुपयाने गाठलेला तळ, रेपो दर वाढण्याची भीती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ याच्या एकत्रित परीणामांमुळे बाजार सहाशे अंकांनी गडगडला. त्यानंतर दुपारच्या सत्रात बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच राहिल्याने आणखी घसरत बाजार आठशे अंकांनी कोसळला. दरम्यान बुधवारी शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू झाले. त्यात रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ होण्याच्या धास्तींने गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. शुक्रवारी व्याजदर वाढ झाल्यास ही सलग तिसरी दरवाढ ठरणार आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या दरवाढीनंतर आता व्याजदर ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढीव किमतींमुळे चलनवाढीची आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याचे पडसाद शुक्रवारीही बाजारावर उमटतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

३ लाख कोटींचा चुराडा : शेअर बाजारात बुधवारपासून सुरू असलेल्या पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे सुमारे ३ लाख ३८ हजार ६८६ रुपये बुडाले आहेत. बुधवारी निर्देशित झालेल्या एकूण कंपन्यांचे भाग भांडवल १ कोटी ४३ लाख ७१ हजार ३५१ कोटी कोटी इतके होते तर त्यांचे मुल्य गुरुवारी १ कोटी ४० लाख ३२ हजार ६६४ इतके झाले. आयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या राजीनाम्यामुळे शेअर वधारला. त्यासह एक्सिस बॅंक, एलएण्डटी, येस बॅंक, पावर ग्रीड, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टाटा स्टिल आदी शेअर वधारले. त्यामुळे बाजार काहीसा सावरण्यास मदत झाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@