शबरीमला निर्णयावर शांतीपूर्ण प्रतिक्रिया द्यावी : सरकार्यवाह भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |
 


मुंबई : शबरीमला देवस्थानात महिलांनाही मुक्त प्रवेश असावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर मात्र संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाचे सरकार्यवाह सुरेश भैय्याजी जोशी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. भैय्याजी जोशी म्हणाले की, “ज्याप्रमाणे आपण सर्व भाविक भारतातील विविध स्थानिक मंदिरात अनुसरत असलेल्या श्रद्धा-परंपरांचा आदर करतो. तसाच आपण सर्वोच्च न्यायालयाचाही मान ठेवला पाहिजे. शबरीमला देवस्थानाचा विषय स्थानिक मंदिर परंपरा आणि आस्थांशी जोडलेला आहे. महिला व लाखो भाविकांच्या श्रद्धांशी हा विषय निगडित आहे. त्यामुळे सदर निर्णयाबाबत विचार करताना श्रद्धाळूंच्या भावनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”

 

”दुर्दैवाने, केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्वरित कार्यवाही करताना श्रद्धाळूंच्या भावनांकडे दुर्लक्ष केले आहे. यावर श्रद्धाळू, विशेषत: महिलावर्ग स्वाभाविकपणे उठलेल्या प्रतिक्रियांतून परंपरांचे सक्तीने उच्चाटनाच्या विरोधात आंदोलन करीत आहे, असे सांगत भैय्याजी जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करीत, सर्व धार्मिक आणि सामाजिक नेत्यांसह या विषयातील सर्व पक्षकारांनी सदर विषयाचे सखोल विश्लेषण करून, न्यायिक पर्यायांसह अन्य सर्व शक्यतांचा विचार करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. त्याचबरोबर जनतेनेही आपल्या आस्था आणि परंपरांना अनुसरून उपासनेच्या अधिकाराच्या हननाबाबतच्या आपल्या चिंता संबंधित अधिकार्यांसमोर शांतीपूर्ण मार्गाने व्यक्त केल्या पाहिजेत,” असे भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@