कुलभूषण जाधव प्रकरण; पुढील वर्षी होणार सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने परिपत्रक काढून जाधव प्रकरणाची पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आता पुढील वर्षी १८ ते २१ फेब्रुवारी कालावधीत हेगमध्ये ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, हेरगिरी व दहशदवादी कारवाईच्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली होती.

 

 

 ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली होती. मात्र जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर आक्षेप घेत भारताने त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@