पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकार, तेल उत्पादक कंपन्या आणि राज्य सरकार यांनी एकत्रित येऊन पेट्रोल डिझेलचे दर पाच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सततच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीला तोंड देणाऱ्या सामान्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दुपारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन अडीच रुपये कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर काहीवेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्यानेही अडीच रुपयांची करकपात करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

 
 
 

नव्या घोषणेनुसार, केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरामागे प्रतिलिटरवर दीड रुपयांची तर तेल उत्पादक कंपन्या प्रतिलिटर मागे एक रुपयांची कपात करणार आहे. तर राज्य सरकारकडूनही पेट्रोलवरील कर कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. जेटली म्हणाले, “सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारतर्फे हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे दर आणखी कमी करण्यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घ्यायला हवा. राज्यांतर्फे लागू केला जाणारा व्हॅट कमी केल्यास पेट्रोल डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होईल.पेट्रोल डिझेलवरील करांमधून राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महसूल जमा झाला आहे, त्यामुळे सध्याची दरवाढ पाहता तूर्त त्यातून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

 
 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले. पेट्रोल डिझेलबाबत ग्राहकांना दिलेल्या अडीच रुपयांच्या दिलाशानंतर महाराष्ट्र राज्य सरकारही आता अडीच रुपये कमी करणार असल्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दर पाच रुपयांनी कमी होणार आहेत. सध्या मुंबईत पेट्रोलचे दर ९१.३४ रुपये आहेत तर डिझेल ८०.१० रुपयांवर पोहोचले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@