प्रत्यक्ष कर संकलनात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 
 

नवी दिल्ली : चालु आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंत ५.४७ लाख कोटी इतके झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये याच कालावधीतल्या संकलनात ‘प्राप्तिकर घोषणा योजना २०१६’ अंतर्गतच्या १० हजार २५४ कोटींचा समावेश होता. चालू वित्त वर्षाच्या संकलनात अशा प्रकारच्या रकमेचा समावेश नाही. प्राप्तिकर घोषणा योजने अंतर्गत बेनामी संपत्ती किंवा अघोषित संपत्ती जाहिर करण्यास सरकारने मुभा दिली होती. मात्र, यंदा अशी कोणतीही आकडेवारी समोर आलेली नाही. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत १.०३ लाख कोटींचा परतावा देण्यात आला आहे. हा परतावा समकालावधीच्या तुलनेत ३०.४ टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत निव्वळ संकलनात १४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@