त्रिपुरात भाजपाचाच बोलबाला...!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
अगरतला : पुन्हा एकदा त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. त्रिपुरामध्ये ३० सप्टेंबर २०१८ रोजी पोटनिवडणुका झाल्या होत्या. ग्राम पंचायतीच्या एकूण ३,२०७ जागांपैकी ३,१८८ जागांवर हा विजय मिळाला आहे. पंचायत समितीच्या १६१ जागांपैकी १५९ जागांवर भाजपाला यश प्राप्त झाले. तसेच जिल्हा परिषदेच्या १८ पैकी १८ जागांवरही भाजपाचा विजय झाला आहे. अशाप्रकारे जिल्हा परिषदेत १०० टक्के जागांवर भाजपाला यश मिळाले. ग्राम पंचायतीत ९९.४ टक्के तर पंचायत समितीत ९९ टक्के जागांवर भाजपाला हा विजय मिळाला.
 

भाजपाला मिळालेल्या या भरघोस यशाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याबद्दल अमित शाह यांनी त्रिपुरातील जनतेचे आभार मानले.

 
 
 
 

भाजपाचा मित्रपक्ष इंडिजिनियस पीपुल्स ऑफ त्रिपुराने ग्राम पंचायतीच्या ९ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस आणि माकपाला ग्राम पंचायतीच्या चार जागांवरच समाधान मानावे लागले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@