बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या ५१ शाखांना लागणार टाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या राज्यभरातील एकूण ५१ शाखा बंद करण्यात येणार आहेत. व्याजदर आकारणीचा भाग म्हणून या शाखा बंद करत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरी भागातून बँकेला जास्त उत्पन्न मिळत नसल्याचे कारण समोर आले आहे.
 

बंद होणाऱ्या या ५१ शाखांमधील खातेदारांची खाती जवळच्या शाखेत हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या ५१ शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड ३१ डिसेंबरनंतर रद्द करण्यात येतील. या शाखांमधील खातेदारांना येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत त्यांचे चेकबुक जवळच्या शाखेत जमा करावे लागणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या राज्यभरात एकूण १९०० शाखा आहेत. त्यापैकी ५१ शाखा बंद करण्यात येणार आहेत. पुण्यातील उद्योगपती डीएस कुलकर्णी यांना दिलेले कर्ज आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन सहव्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे आणि इतर पाच जणांना अटक करण्यात आली होती.

 

‘या’ आहेत त्या ५१ शाखा:

मुंबई, कॉटन, सिनिअर सिटीझनए, वांद्रे पश्चिम, डॉ. अॅनी बेझंट रोड ब्रँच, कॉर्पोरेट फायनान्स, एसएचजी मुंबई

ठाणे, बोईसर, अलयाली इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, एसएचजी ठाणे, वसई पश्चिम, एपीएमसी वाशी, विरार पूर्व, नालासोपारा पूर्व

पुणे पूर्व, नेरे, पूर्व, विनझार, पेन्शन पेमेंट, ससून रोड पुणे, एसएचजी पुणे

सोलापूर, सोलापूर शिवशाही

कोल्हापूर, कोल्हापूर खासबाग

अमरावती, राजपेठ अमरावती, अर्जुन नगर

जळगाव, गणपतीनगर

लातूर, पीपल कॉलेज कॅम्पस बीआर. नांदेड, योगेश्वरी ब्रँच

नागपूर, नागपूर यशवंत, मिड कॉर्पोरेट ब्रँच नागपूर

नाशिक, हल टाऊनशिप, ओझर, मिड कॉर्पोरेट ब्रँच, एसएचजी नाशिक

सातारा, एसएचजी सातारा, मिड कॉर्पोरेट ब्रँच सातारा

जळगाव, दत्ता मंदिर चौक, धुळे

औरंगाबाद, एसएचजी ब्रँच, एसएचजी जालना

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@