कॅनडाने 'या' नोबेल विजेतीचे नागरिकत्व काढून घेतले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
ओटावा : नोबेल शांती पुरस्कार विजेत्या आंग सान स्यू की यांचे मानद नागरिकत्व कॅनडाने काढून घेतले आहे. आंग सान स्यू की या म्यानमारच्या नेत्या आहेत. म्यानमारमध्ये रोहिंग्या प्रकरणी त्यांनी मौन बाळगले होते. एखाद्या देशाने असे एखाद्या नोबेल विजेत्याचे नागरिकत्व काढून घेण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे.
 

२००७ मध्ये कॅनडाच्या संसदेने आंग सान स्यू की यांना मानद नागरिकत्व बहाल केले होते. म्यानमारमधील रोहिंग्या प्रकरणी मौन बाळगल्यामुळे आंग सान स्यू की यांची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन झाली आहे. रोहिंग्या प्रकरणी त्यांनी आवाज उठवणे अपेक्षित होते, त्यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकण्यात आला होता. परंतु तरीही त्यांनी रोहिंग्या प्रकरणी मौन बाळगले. म्यानमार सरकारची कारवाई ही नरसंहार असल्याचे कॅनडाने गेल्याच आठवड्यात म्हटले होते. अखेर आंग सान स्यू की यांचे मानद नागरिकत्व काढून टाकण्याचा निर्णय कॅनडाच्या संसदेत सर्वानुमते घेण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@