मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पोने ६ कामगारांना उडवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आज सकाळी एक अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने सहा जणांना उडवले. हा टेम्पो भरधाव वेगात येत होता. खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत.
 

हे सहाजण कामगार होते. हे कामगार रस्त्यावर व रस्त्याच्या शेजारी असणारे पांढरे पट्टे रंगविण्याचे काम करत होते. अचानक एक टेम्पो भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला आणि या टेम्पोने कामगारांना उडवले. त्यानंतर या टेम्पोने दुसऱ्या टेम्पोलाही धडक दिली. या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@