शेअर बाजार सावरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण बुधवारी बंद झाली. दुपारच्या सत्रानंतर आयटी, फायनांशिअल आणि फार्मा सेक्टरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५११ अंशांनी वधारुन ३४ हजार ४४२ अंशांवर पोहोचला. निफ्टी १८८ अंशांनी वाढून १० हजार ३८७ अंशांवर बंद झाला.

 

सकाळच्या सत्रात हलकी खरेदी दिसून आल्याने बाजार वधारला. मात्र, काहीवेळाने दोन्ही निर्देशांकांमध्ये पडझड झाली. दुपारच्या सत्रात बाजार सावरला. टेक महिंद्रा, इंडियाबुल्स, एचडीएफसी, एचसीएलटेक, हिंदुस्थान युनिलिवर आदी शेअर वधारले. निफ्टीमध्ये कोल इंडिया, टाटा स्टील, हिंडाल्को, मारुति शेअर घसरणीसह बंद झाले. जागतिक बाजारात मजबूतीचे संकेत मिळाल्याने दोन्ही निर्देशांकात वाढ झाली.

 

मिड कॅप स्मॉल कॅप वधारले

 

लार्जकॅपसह मिडकॅप, स्मॉलकॅप शेअरमध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.५६ टक्क्यांनी वधारला आणि १४ हजार ६२१ अंशांवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स १.३८ टक्क्यांनी वधारले.

 

बॅंक निफ्टी वधारला

 

बॅंक निफ्टीमध्ये १.३९ टक्क्यांनी वाढ झाली. २५ हजार १५३ अंशांच्या स्तरावर बंद झाला. निफ्टी आयटी इंडेक्स ४.०७ टक्क्यांनी वाढला. फानान्शिअल इंडेक्स २.३२ टक्के, फार्मा इंडेक्स २.३३ टक्के, पीएसयू बॅंक इंडेक्स १.५६ टक्के, प्रायव्हेट बॅंक इंडेक्स १.५६ टक्के फार्मा इंडेक्स २.३३ टक्के, ऑटो इंडेक्स ०.८७ टक्के आणि रियल्टी इंडेक्स १.५६ टक्क्यांनी वधारले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@