पाचोरा पीपल्स बँकेवरील प्रशासकाला स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |
 
पाचोरा :
पाचोरा पीपल्स कॉ- ऑप बँकेच्या आठ संचालकांनी चेअरमन अशोक संघवी यांनी बँकेतील नोकरभरती संचालकांना विश्वासात न घेता आरक्षणनुसार न भरल्याने मनमानी कारभार विरोधात आठ संचालकांनी २२ ऑक्टोबर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर र्बॅकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र बँकेची चेअरमन अशोक संघवी यांनी उपनिबंधक यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जाची दखल घेत प्रशासकाला स्थागिती देण्यात आली आहे.
 
 
बँकेच्या संचालकांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था जळगाव अडमिनिस्टेटची ऑर्डर काढली. २३ रोजी ही ऑर्डर बँकेस प्राप्त झाली. ही ऑर्डर बँकेस प्राप्त झाल्यानंतर वकील यांच्या सहमतीने २३ रोजी बँकेचे चेअरमन अशोक संघवी व इतर संचालक यांनी उपनिबंधक संस्था नाशिक यांच्याकडे स्थगितीसाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जाची दखल घेत उपनिबंधक नाशिक यांनी जिल्हा निबंधक जळगाव यांनी दिलेल्या ऍडमिनिस्टेटच्या ऑर्डरला स्थगिती देण्यात आली आहे. या ऑर्डरनुसार हे प्रकरण १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता जॉईंट रजिस्टर नाशिक यांच्या समोर हेरिंगसाठी ठेवण्यात आले आहे व सदरील बँकेचा सर्वतोपरी चार्ज बँकेचे चेअरमन अशोक संघवी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कारण ही ऑर्डर बँकेच्या ठेवीदारांच्या हितावह असल्याकारणाने पुढील आदेश होईपावेतो स्थगिती देण्यात आली आहे. आठ संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर म्हणणे मांडण्यासाठी बँकेस संधी नाकारल्याने विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी पुढील आदेश होईपावेतो बँकेवरील प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यभारास स्थगिती देण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@