राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : दरवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊसमान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक विहिरी, नद्या, तळी, चारा प्रश्न आदी स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने बुधवारी दुष्काळ जाहिर केला. २६ जिल्ह्यातील ११२ तालुक्यांमध्ये गंभीर आणि ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झाला आहे.


अहमदनगर, बीड, जळगाव आदी जिल्ह्यात प्रामुख्याने दुष्काळी परिस्थिती आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेली पर्जन्य तूट, भूजल पातळीतील घट, वनस्पती निर्देशांक, मृद आद्रता आदी बाबी लक्षात घेत दुष्काळी तालुक्यांची घोषणा करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिने दुष्काळ जाहिर करण्यात येणार आहे.

 

अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सर्व तालुकास्तरावर दुष्काळ सदृश्य स्थिती यापूर्वीच जाहिर केली होती त्यानुसार प्रत्येक तालुक्यात उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@