खुल्या महाविद्यालयीन निवडणुका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |

सरकारच्या निर्णयाचे अभाविपकडून स्वागत

 
जळगाव, ३० ऑक्टोबर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अनेक वर्षांपासून खुल्या महाविद्यालयीन निवडणुकांसाठी संघर्ष करत होती. त्याला यश आले असून, राज्य शासनाने परिपत्रक काढून या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.
 
 
अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री अभिजीत पाटील म्हणाले की, राज्य शासनाचे परिपत्रक देर आये दुरुस्त आये या प्रकारचे आहे. आजच्या परिपत्रकाबद्दल महाराष्ट्र शासन व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभाविपकडून अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र, या निवडणुका तात्काळ यावर्षी होतील या दृष्टिकोनातून आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
महाविद्यालयीन निवडणुकांमधून खर्‍या अर्थाने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व पुढे येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@