मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. हत्या, दहशवादाचा कट रचणे आणि अन्य काही कलमांअंतर्गत सातही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह एकूण सात आरोपी आहेत. २ नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल या परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती. आज १० वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@