मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १४,५०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता. त्यात ५०० रुपयांची वाढ करून यावर्षी हा बोनस १५,००० रुपये एवढा देण्यात येणार आहे.
 

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा किमान ४०,००० रुपये बोनस म्हणून मिळावेत. अशी मागणी मुंबई महापालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने केली होती. परंतु एवढी रक्कम बोनस म्हणून देणे शक्य नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले व गेल्यावर्षीच्या बोनसच्या रक्कमेत ५०० रुपयांची वाढ करून १५,००० रुपये दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@