मुस्लीम कुटुंबाने केला हिंदू धर्माचा स्वीकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील बडोत येथील घटना


 

उत्तर प्रदेश : बागपत जिल्ह्यात पोलिसांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे एका मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्माचा स्वीकार केला. हिंदू युवा वाहिनीच्या मदतीने या २० जणांनी होमहवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला. बागपतचे जिल्हाधिकारी ऋषिरेंद्र कुमार यांनी सांगितले की, बडोत तहसीलमधील काही लोकांनी स्वेच्छेने धर्म परिवर्तनाचे शपथपत्र दिले आहे. हत्येसंबंधीत प्रकरणाशी संबंधित असलेले हे पीडित कुटुंबीय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नव्हते. 

 

छपरौली ठाण्यातील बदरखा येथील रहिवासी अख्तर हे मागील ६ ते ७ महिन्यांपासून बागपत कोतवाली क्षेत्रातील निवाडा गावातील खुब्बीपुरा येथे राहत आहेत. मंगळवारी सकाळी बदरखा गावात होमहवन आणि हनुमान चालिसाचे पठाण केले गेले. यामध्ये विधीवत मुस्लीम कुटुंबामधील २० लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला. यामध्ये अख्तर अली, नफिसा, झाकिर, दिलशाद, नौशाद, इरशाद आणि परिवारातील अन्य लोकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनीही काही मुस्लीमांनी धर्म परिवर्तन केल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@