स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

 


 
मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स यांना कल्पना मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यासपीठ उपलब्ध केले आहे. स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला आज ३ ऑक्टोबरपासून शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व स्टार्टअप्सना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
 
 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी .विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षण मंत्री विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेलकर आणि राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते या स्टार्टअप यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. या स्टार्टअप यात्रे अंतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी बूट कँप आणि यात्रा थांबा उभारण्यात आले आहेत. 

 
 
 

बूट कँप : ८ ऑक्टोबर - ठाणे(डोंबिवली)

९ ऑक्टोबर – नाशिक

११ ऑक्टोबर – नंदुरबार

१३ ऑक्टोबर – जळगाव

१५ ऑक्टोबर - औरंगाबाद

१६ ऑक्टोबर - बीड

१७ ऑक्टोबर – सोलापूर

२० ऑक्टोबर - सिंधुदुर्ग (सावंतवाडी)

२२ ऑक्टोबर – रत्नागिरी

२४ ऑक्टोबर - पुणे (बारामती)

२६ ऑक्टोबर - हिंगोली

२७ ऑक्टोबर – अकोला

२९ ऑक्टोबर - चंद्रपूर

३१ ऑक्टोबर – नागपूर

यात्रा थांबा : ४ ऑक्टोबर - पालघर

४ ऑक्टोबर – कल्याण

६ ऑक्टोबर - वेंगुर्ला

६ ऑक्टोबर – मालवण

८ ऑक्टोबर – राजापूर

८ ऑक्टोबर - कुडाळ

९ ऑक्टोबर - कोल्हपूर

९ ऑक्टोबर – सांगली

१० ऑक्टोबर – पुणे

११ ऑक्टोबर – अहमदनगर

१२ ऑक्टोबर - औरंगाबाद

१२ ऑक्टोबर – शिर्डी

१३ ऑक्टोबर – मालेगाव

१३ ऑक्टोबर – धुळे

१५ ऑक्टोबर - जळगाव

१६ ऑक्टोबर – बीड

१७ ऑक्टोबर – नांदेड

१९ ऑक्टोबर – यवतमाळ

१९ ऑक्टोबर – अमरावती

२० ऑक्टोबर – भंडारा

२२ ऑक्टोबर – चंद्रपूर

२२ ऑक्टोबर – गडचिरोली

२३ ऑक्टोबर - नागपूर

 
या यात्रा थांब्यामधून आणि बूट कँपमधून सर्व स्टार्टअप्स व नव उद्योजकांना या स्टार्टअप यात्रेचा लाभ घेता येईल. ३ तारखेला नागपूर येथे या स्टार्टअप यात्रेची सांगता होईल. या स्टार्टअप यात्रेतून अनेक नव्या संकल्पना उदयास येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्टार्टअप  इंडिया योजनेचा ही महाराष्ट्र यात्रा भाग असून त्यांचा अनेक उद्योजकांना फायदा होणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@