शेअर बाजार तीन महिन्यांच्या निचांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |
 

 मुंबई : भारतीय चलनमुल्य रुपयाचे होणारे अवमुल्यन, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे परीणाम आणि इंडीयन मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या निर्णय आदींबाबत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने त्याचे परीणाम बुधवारी दोन्ही शेअर बाजारावर उमटले. दोन्ही निर्देशांक गेल्या तीन महिन्यांच्या निचांकावर पोहोचले.

 
 
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५१ अंशांनी घसरुन ३५ हजार ९७५.६३ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५० अंशांनी घसरून १० हजार ८५८वर बंद झाला. गेल्या सात महिन्यांतील एका दिवसात होणारी ही सर्वात मोठी पडझड आहे. सेन्सेक्सच्या सुमारे बाराशे शेअर निचांकी पातळीवर नोंदवले गेले. केवळ धातू उद्योगांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स मिडकॅप इंडेक्स ०.१५ टक्के अशांनी वधारला तर निफ्टी मिडकॅप शंभर अंशांनी घसरला. बीएसई स्मॉलकॅप ०.५५ टक्क्यांनी वधारून सावरला. दिवसभरात येस बॅंक, टाटा स्टील, सन फार्मा, अदानी पोर्ट, कोटक बॅंक, ओएनजीसी, बजाज ऑटो, एचडीएफस, वेदांता, आयटीसी आदी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर विप्रो, मारुति, भारती एअरटेल, आयसीआयसी बॅंक, टीसीएस, एलएण्डटी, एचडीएफसी बॅंक, इंडसइंड बॅंक, इन्फोसिस, एसबीआय आणि रिलायन्स आदी शेअर्समध्ये घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवर धातू, ऑटो, आयटी, एफएमसीजी आदी क्षेत्रात घसरण झाली. बॅंक निफ्टी ०.६७ अंशांनी घसरुन २५ हजार १९७.८० वर स्थिरावला. ऑटो इंडेक्स १.६० टक्के, एफएमसीजी इंडेक्स ०.७२ टक्के, आयटी इंडेक्स ०.९४ टक्के, पीएसयु बॅंक इंडेक्स ०.२० टक्क्यांनी घसरले. केवळ मेटल इंडेक्स ०.३६ टक्के आणि मीडिया इन्डेक्स ०.९४ टक्क्यांनी वधारले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@