आंबेडकर- ओवेसी युतीची चिंता नाही: आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |


 


मुंबई: "भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे यांच्या युतीची चिंता नाही." अशी खोचक टीका रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भारिप-एमआयएमच्या युती झाली असली तरी जनता आमच्याच सोबत असेल असेही त्यांनी सांगितले.

 

"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरणचीही सभा मोठी व्हायची, पण त्यांना मते मिळत नव्हती. सभेला गर्दी झाली म्हणजे सगळी मते मिळतील असे होत नाही." असा टोलाही त्यांनी लगावला. "प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी एकत्र आल्याने आमचाच फायदा होणार आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांचे चांगले मत आहे, त्यांच्या युतीचा आम्हाला फायदाच होईल. अकोल्याच्या बाहेर प्रकाश आंबेडकर यांना फायदा होणार नाही. दलित मतांमधील महत्वाची मते आमच्यासोबत असणार आहेत." असा विश्वासही त्यांनी दर्शविला.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@