राफेल करार हा गेम चेंजर: एअर चीफ मार्शल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली: "फ्रान्सकडून विकत घेण्यात येणारी राफेल फायटर विमाने आणि एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम हे दोन्ही करार भारतीय वायुसेनेसाठी फायद्याचे आहेत." असे एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी सांगितले. सध्या देशात राफेल करारावरून गदारोळ सुरु असताना त्यांनी केलेले हे विधान खूप महत्वपूर्ण आहे.

 

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. एस-४०० मिसाइल सिस्टिम भारत रशियाकडून विकत घेणार आहे. करार झाल्यानंतर २४ महिन्यांच्या आत भारताला एस-४०० मिसाइल सिस्टिम मिळेल.राफेल कराराचे आपल्याला खूप फायदे असून हे विमान गेमचेंजर ठरेल, असे धानोआ यांनी सांगितले. मागच्याच आठवड्यात इस एअर चीफ देव यांनी देखील राफेल कराराचे समर्थन केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@