न्या. रंजन गोगोई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ


 

नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्या. गोगोई हे १३ महिन्यासाठी सरन्यायाधीशपदी असणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. दरम्यान, न्या. गोगोई हे पूर्वेकडील राज्यातील पहिले सरन्यायाधीश आहेत.
 
 

जस्टिस रंजन गोगोई हे भारताचे ४६ वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश दिपक मिश्रा हे २ ऑक्टोबर रोजी निवृत्त झाल्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. गोगोई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे न्या. गोगोई आजपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत.

  
 

न्या. गोगोई हे मूळचे आसामचे असून त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री होते. यापूर्वी न्या. गोगोई यांनी गुवाहाटी, पंजाब व हरियाणा येथील हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. तसेच २३ एप्रिल २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी न्या. गोगोई याची शिफरस केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@