…आणि इन्स्टाग्राम झाले बंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
मुंबई : काल मंगळवारी २ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्राम हे जवळपास १ तासासाठी बंद झाले होते. अनेकजणांना इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यास शेअर करण्यास अडथळा येत होता. तसेच इन्स्टाग्राम रिफ्रेश केल्यानंतर Cannot refresh feed असा Error देखील येत होता. इन्स्टाग्राम अॅप व्यतिरिक्त इन्स्टाग्रामच्या वेबसाइटवरही 5xx Serever Error असा संदेश यूजर्सना दिसत होता. इन्स्टाग्राम एक तासासाठी बंद होते तर जगभरातील यूजर्सनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. यूजर्सनी ट्विटरवर यासाठी #instagramdown हा हॅशटॅग तयार केला. थोड्याच वेळात हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडमध्येही आला.
 

२०१० मध्ये इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मची स्थापना झाली होती. २०१२ मध्ये फेसबुकने तब्बल १ अब्ज डॉलर देऊन इन्स्टाग्राम खरेदी केले. त्यानंतर इन्स्टाग्रामच्या दोन फाउंडर्सनी राजीनामा दिला. एडम मोसेरी हे इन्स्टाग्रामचे नवे प्रमुख असल्याची घोषणा फेसबुकने काही दिवसांपूर्वीच केली होती. ७ कोटी भारतीय हे इन्स्टाग्रामचे अॅक्टीव्ह यूजर्स आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो, स्टोरीज अपलोड करणे हा अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु इन्स्टाग्राम काल १ तासासाठी बंद असल्याने भारतीय यूजर्सकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@