सिडकोच्या 14 हजार 838 घरांची सोडत संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |



नवी मुंबई : सिडकोतर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांची ऑनलाईन संगणकीय सोडत मंगळवारी संपन्न झाली. या प्रसंगी योजनेचे अर्जदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in वरून करण्यात आले होते.

 

प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या अर्जांतून स्वतंत्रपणे योजना संकेत क्रमांक व आरक्षण प्रवर्ग क्रमांक निहाय जाहीर सोडत संगणकाद्वारे काढण्यात आली. परंतु जर प्रत्येक योजनेत अथवा प्रवर्गाकरिता उपलब्ध सदनिकांच्या संख्येपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले अथवा पहिल्या सोडतीनंतर सदनिका शिल्लक राहिल्यास ज्या अर्जदारांनी अर्ज भरतेवेळीअन्य गृहनिर्माण योजनेतील रिक्त सदनिका देण्याबाबत आपला विचार व्हावा’ यासाठी संमती दिली असेल, अशा अर्जदारांमधूनच सोडत काढण्यात आली. सोडतीचा निकाल सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in आणि https://lottery.cidcoindia.com वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यशस्वी अर्जदारांना सिडको महामंडळातर्फे सदनिका प्राप्त झाल्यासंदर्भातील एसएमएस पाठवण्यात येणार आहेत.

 

आवास योजनेंतर्गत अनुदान मिळणार

 

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर मिळाल्यास एकूण अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे, तर सीएलएसएसच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांना 2.67 लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे आणखीन 25 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@