वुमन इन पॉवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
बांगलादेशसारख्या विकसनशील देशात स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर पहिल्या महिला मेजर जनरल बनणाऱ्या डॉ. सुसाने गिती यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
 

‘स्त्री’ या शब्दाबरोबरच प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या सगळ्या भावना आपल्या समोर येतात. पण समाजात शक्तिसंपन्न स्त्री असे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळते. म्हणजे फार तर, ‘स्त्री’ची शक्तिसंपन्न अशा छबीची प्रगत आणि विकसित समाजात आपण कल्पना करू शकतो. मात्र, बहुतांशी समाजात स्त्रियांचे महत्त्व, तिच्या विषयी संवेदनशीलता व आदर नगण्यच आहे. आजही कर्तृत्ववान स्त्रियांच्या कथा आपण सगळ्याच देशांमधून ऐकत नाही. याचे मूळ कारण प्रत्येक देशात ‘स्त्री’चे स्थान हे त्यांच्या विचारसरणीशी जोडलेले असते. मात्र, “आपण स्त्री आहोत म्हटल्यावर कोणावर तरी अवलंबून राहायला हवे असे नाही, तर स्वावलंबनाचे ‘स्त्री’ हे बीज आहे,” असे वाक्य जेव्हा एका महिलेकडून आपण ऐकतो, तेव्हा ती महिला एखाद्या विकसित देशातील असावी, असे वाटते. पण बांगलादेशासारख्या विकसनशील देशातील पहिल्या महिला मेजर जनरल ‘डॉ. सुसाने गिती’ यांचे हे उद्गार आहेत.

 

महिला मेजर जनरल हे पद भारतासारख्या देशासाठी नवीन नाही, म्हणजे निदान भारतात आपण लष्करात महिलेला असे उच्च पद मिळणे, पचण्यासारखे आहे. मात्र, बांगलादेशासारख्या देशाने एका महिलेला हा सर्वोच्च मान देऊन जगातील सर्वच महिलांना एक मानाचे स्थान दिले आहे. डॉ. सुसाने गिती या बांगलादेशाच्या पहिल्या महिला आहेत, ज्यांना मेजर जनरल होण्याचा मान मिळाला आहेसुसाने यांना हे पद मिळाल्यानंतरच साहजिकच त्यांचे कौतुक करणारे जेवढे होते, तेवढेच त्यांना टोमणे मारणारेही होते. असाच एक घडला जेव्हा इंग्रजी वृत्तपत्राच्या एका पत्रकाराने मुलाखती दरम्यान गिती यांना “तुम्हाला तुम्ही महिला आहात, म्हणून हे पद मिळाले आहे का?” तेव्हा गिती यांनी, “मी महिला आहे म्हणजे मी दुर्बल आहे, असे नाही. लष्करात पदन्नोती मिळवण्यासाठी अनेक मानदंड असतात. त्यामुळे तिथे तुमच्या लिंगापेक्षा तुमच्या कामाला महत्त्व असते,” असे त्यांनी त्या पत्रकाराला ठणकावून सांगितले.

 

मुद्देसुद बोलणं, परखड व्यक्तिमत्व अशा सुसाने यांची स्वत:शीच स्पर्धा सुरू झाली ती १९८६ पासून. त्यांना नेहमीच जवानांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचाराने त्या आर्मी डॉक्टर झाल्या आणि सध्या गिती या बांगलादेशी सैन्यदलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गिती यांनी १९८५ मध्ये बांगलादेशमधील राजशाही वैद्यकीय महाविद्यालयातून आपली डॉक्टरकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये सैन्यन्यदलात कॅप्टनपदावर फिजिशियन म्हणून कामास सुरुवात केली. त्यावेळी हेमॅटॉलॉजी या किचकट विषयात पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या बांगलादेशी महिला होत्या. त्याच्या संशोधन आणि वैद्यकिय क्षेत्रातील योगदानामुळे गिती यांनी अनेक जन्मजात रोगांचे निवारण केले आणि बांगलादेशातील अनेक मुलांना निरोगी केले. “बांगलादेश हा देश अविकसित असला तरी, असमर्थ नाही,” असे त्यांचे ठाम मत आहे. “ज्या देशात महिलांना मान, सुरक्षा आणि स्वातंत्र्य नाही, तो देश कधीच विकसित होऊ शकत नाही,” असेही त्या म्हणतात. “आम्ही लष्करात सामील झालो तेव्हा लष्करात फक्त वैद्यकीय क्षेत्रात महिलांची भरती केली गेली. आता महिलांना सैनिकपदावरही घेतले जात आहे. त्यामुळे आता महिला पुढे जाऊ शकतात व भविष्यात आणखी यशस्वी होऊ शकताता,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुसाने यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत महिला पॅथॉलॉजिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिकाही बजावली होती. लायबेरीयासारख्या जगाच्या नकाशातही लोकांना शोधून न सापडणाऱ्या देशात जाऊन त्यांनी आपले संशोधन केले आणि तेथील डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेतल्या. त्यांना विश्वास आहे की हे जग तेव्हाच निरोगी होईल, जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहू. गिती यांनी भारताविषयी विशेष कौतुक आहे. कारण “भारतासारखा शेजारी मिळणं, हे आमचं भाग्य आहे,” असेही त्या संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत म्हणाल्या होत्या. सिसेन गिती यांना शिक्षणाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच पदव्या मिळवल्या आहेत. त्या एमबीबीएस असून त्यांच्याकडे एमसीपीएस, एफसीपीएस, एमएमएडी या पदव्याही आहेत. यापुढे त्यांना संशोधन क्षेत्रात काम करायचे असून, या विश्वाला निरोगी करायचे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच त्यांना हा मान सर्वाच्च मान मिळाला आहेमात्र, त्या आजही गावागावात फिरून आपल्या डॉक्टर व रुग्णांच्या कार्यशाळा घेतात. मेजर जनरल हे पद मला जरी मिळाले असले तरी, मी एक डॉक्टर आहे आणि शेवटपर्यंत एक डॉक्टरच राहीन. मात्र, सुसाने गिती यांचे “महिलांना फक्त पॉवर द्या, त्या तुम्हाला दाखवून देतील,” हे संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेतील वाक्य आजही जगातील कित्येक लोकांना प्रेरणा देणारे आहे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@