अण्णांचे उपोषण स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे. “विविध मागण्यांबाबत सरकारने उचललेली काही पावले आश्वासक आहेत. त्यातून आशेचे किरण दिसत आहेत, त्यामुळे उपोषण स्थगित करीत आहोत,” अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली. गांधी पुण्यतिथीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास गांधीजींच्या पुण्यतिथीला पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही अण्णांनी दिला आहे.
 

अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सकाळीच राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यांनी अण्णांशी चर्चा करून, सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. शिवाय अण्णांच्या मागण्यांबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून, तातडीने मागण्यांवर सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. सरकारच्या आश्वासनानंतर अण्णा हजारे यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले मात्र, यावेळी अण्णांनी शेतीप्रश्न, दूध दर, लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. “कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या, दुधाला दर द्या, केंद्रातील लोकपालप्रमाणे राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती करा,” अशा मागण्या अण्णांनी केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@