इंडोनेशिया विमान दुर्घटना : विमानाचा पायलट भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |
 

जकार्ता : इंडोनेशियातील जकार्ताहून पांगल पिनांग शहराच्या दिशेने जात असलेले लायन एअरचे विमान सोमवारी सकाळी समुद्रात कोसळले. विमानातून दोन पायलटसह १८९ प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सोमवारी सकाळी विमानाने उड्डाण केले. पायलटने माघारी परतण्याची विनंती केली होती, दरम्यान विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.
 

दोन पायलट पैकी एक जण भारतीय असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कॅप्टन भव्य सुनेजा असे त्यांचे नाव आहे. ते नवी दिल्लीतील रहिवासी असून त्यांनी २०११मध्ये ते पायलट म्हणून सेवेत रुजू झाले होते. या विमानातून इंडोनेशियाच्या अर्थखात्याचे २० अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर सुमारे ३.७ किलोमीटर दूर अंतरावर कारावांग खाडीत विमान कोसळले. विमानाचे अवशेष या भागात सापडले असून इंडोनेशियाचे नौदल बचाव पथक या भागात पोहोचले आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.

 

लायन जेटी ६१० हे विमान सोमवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी निघाले. उड्डाण केल्याच्या १३ मिनिटांतच हे विमान गायब झाले. त्यावेळेस विमान पाच हजार फूटांवर होते. या विमानाची दोन महिन्यांपूर्वीच खरेदी झाल्याची माहिती उघडकीस येत आहे. बोईंग कंपनी ७३७ मॅक्स ८ विमानाचा हा पहिलाच अपघात आहे.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@