तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
तळोजा : तळोजा नावाडा येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हा स्फोट झाला असून या स्फोटात एक कर्मचारी जखमी झाला आहे. सकाळी या कंपनीतील बहुसंख्य कर्मचारी हे नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा खोदत असताना केमिकल ड्रमला जेसीबीचा फावडा लागला. त्यामुळे स्फोट झाल्याचे कारण समोर आले आहे. या जेसीबीचा चालक या स्फोटात जखमी झाला असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील १४ गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. या स्फोटानंतर या भागातील ग्रामस्थांनी ही कंपनी बंद करावी अशी मागणी केली. ग्रामस्थांनी तशी निदर्शनेही या कंपनीबाहेर केली. स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील आगासन गावापर्यंत भूकंपासारखे हादरे जाणवल्याचे वृत्त आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@