मराठा समाजाचा स्थापन होणार नवा पक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची पत्रपरिषदेत घोषणा


 
जळगाव, २६ ऑक्टोबर
मराठा समाजाच्या जोरावर बहुतेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. परंतु, मराठा समाजाच्या आमदार, खासदारांनी सत्ता उपभोगतांना समाजातील मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा समाजात याबाबत असंतोष पसरलेला आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नव्या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना मराठा समाज करीत आहे. पक्षाची घोषणा पुण्यात गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी होईल, अशी घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रपरिषेदमध्ये दिली.
 
 
शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात सोमवारी दुपारी पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा.चंद्रकांत भराट (औरंगाबाद), राज्य कार्यकारणीचे सदस्य पी.एस.पाटील (जळगाव), विलास सावंत (रायगड), अविनाश पवार (ठाणे), रणजीत बाबर (पुणे), परेश भोसले (कोल्हापूर) तसेच जळगाव जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, प्रमोद पवार, डी.बी.पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शेखर देशमुख, राजू भदाणे, प्रदीप जाधव, प्रशांत फडके, सुनिल पाटील, प्रा.संभाजी देसाई, विजय पाटील उपस्थित होते.
 
 
 
सोशल मिडियातून सर्वेक्षण
समाजाला न्याय मिळवायचा असेल तर स्वतःच शस्त्र हाती घेतले पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण संघर्ष समितीने सोशल मिडियाच्या सर्वेक्षणात राज्याभरातून पक्ष स्थापनेबाबत सकारात्मक प्रतिसाद देवून संमती दर्शविली. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ, मुंबई, पुणे, खान्देश या विभागातून पक्ष स्थापनेबाबत मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यातूनच मराठा समाजाने प्रत्यक्ष राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. पुणे जिल्ह्यातील भोर येथील रायरेश्‍वर शंभू महादेवाच्या मंदिरात नव्या पक्षाच्या नावाची घोषणा होवून पक्षाचे चिन्हे ठरविण्यात येणार आहे, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
 
 
खान्देशातून लोकसभेसाठी दोन जागा लढवणार
मराठा समाजाच्या स्वतंत्र राजकीय पक्षामध्ये मुख्य संघटक कोअर कमिटी आणि प्रत्येक जिल्ह्यातून १० पदाधिकार्‍यांची तसेच प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकारीणी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येणार आहे. खान्देशातून लोकसभेच्या १० जाणांपैकी दोन तर जळगावहून एक जागा मराठा समाज लढवणार आहे. तसेच विधानसभेसाठी ५० च्यावर जागा पक्षातर्फे लढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 
 
पहिली निमंत्रक राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत
इतर पक्षांतील उमेदवारांना नव्या पक्षात शपथ दिली जाणार आहे. सत्ताधार्‍यांवर दबाब गट तयार करुन समजातील मागण्या पूर्ण करण्यासाठी हा पक्ष स्थापन होणार आहे. तसेच मराठ्याची ताकद, वोटबँक तयार करण्याचा पक्षाचा मानस आहे. राज्यातील नऊ शेतकरी संघटनांचा नव्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात पक्षाची पहिली निमंत्रक राज्य कार्यकारीणीची बैठक १ नोव्हेंबरला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
 
प्रत्येक जिल्ह्यात निघणार संघर्ष रथ
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघर्ष रथ निघणार आहे. रथाची सुरुवात १५ नाव्हेबर रोजी कोल्हापूर येथून होऊन पंढरपूर येथे शेवट होणार आहे. संषर्घ रथामध्ये पक्षाची नवीन धोरणे, शेतकर्‍यांची आत्महत्या, मराठा आरक्षण, महिला प्रशिक्षण आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पक्षासाठी खा.श्रीमंत उदयराजे भोसले यांचे आशीर्वाद तसेच पाठबळ लाभत आहे.
@@AUTHORINFO_V1@@