मुंबई मेट्रो ३च्या लिफ्ट कार्यप्रणालीचा करार संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |


 


मुंबई: मुंबई मेट्रो ३च्या १४ मेट्रो स्थानकांच्या जायका कंपनीकडून कायदेशीर पडताळणीनंतर लिफ्ट कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण करार संपन्न झाला आहे. यामध्ये सिद्धिविनायक ते कफ परेडमधील १४ स्थानकांचा समावेश आहे. युआंडा - रॉयल कन्सोर्टियम’ चायना कन्सोर्टियम’ यांच्यासह हा करार झाला आहे.

 

‘युआंडा - रॉयल कन्सोर्टियम’ चायना कन्सोर्टियम’ ही कंपनी संबंधित बोलीदारांमधील सर्वात स्पर्धात्मक असल्याने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने हा करार संबंधित कंपनीसोबत केला आहे. या कामामध्ये एकूण १४ स्थानकांच्या लिफ्टचे डिझाइन, निर्मिती, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसह इतर संबंधित ८६ प्रकारची कामे ही कंपनी करणार आहे. जास्त प्रवाशांच्या ये- जा करण्याकरिता संक्षिप्त रूपातल्या या लिफ्टवर विशेष पद्धतीने लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे ऊर्जाबचत व्हावी त्यासाठी रियल टाइम मॉनिटरेटिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लिफ्टचे काम चालणार आहे.

 

"मेट्रो ३ च्या भुयारी प्रवासात लिफ्ट्स अंमलबजावणी हा प्रवाशांच्या आरामदायक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो ३ साठी मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत लिफ्ट्स प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा आमचा उद्देश आहे आणि वेळेत कार्य पूर्ण करावे जेणेकरून लाइन ३ हा प्रकल्प निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केला जाऊ शकेल." असे मत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@