‘जलयुक्त शिवार’चे यश हेच चार वर्षांतले सर्वात मोठे फलित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |


 


मुंबई (किरण शेलार): “ ‘जलयुक्त शिवार’ सारख्या संकल्पनेला लोकांनी दिलेला प्रतिसाद हीच आपली गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी उपलब्धी असून त्याच्यासारखे अन्य समाधान नाही,” असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सरकारने चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल ते बोलत होते. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या चार वर्षांतील आपले सांगण्यासारखे यश कोणत्या विषयात मिळाले, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ’जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून एकूण १६ हजार, ५२२ गावांना लाभ झाला असून एकूण ५ लाख, ५७ हजार, ३८६ इतक्या गावांना त्याचा उपयोग झाला आहे. यातून २४ लाख, ०५ हजार, ५०२ टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण झाला असून ग्रामीण भागात त्याचा मोठा उपयोग होणार आहे सुमारे ३४ लाख,२३ हजार,३१६ हेक्टर इतके मोठे क्षेत्र आज सिंचनाच्या क्षमतेकडे वळते झाले आहे, असेही ते म्हणाले. या क्षेत्रातील उत्पादकतेमध्ये सुमारे ४५ टक्के वाढ झाल्याचाही मुख्यमंत्र्यांनी दावा केला.

 

पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात टँकर्सचा वापरही महाराष्ट्रात कमी झाला असून २०१६ साली ही संख्या ५४२३ होती व आज मात्र २०१८ साली हा आकडा १०४७ इतका झाला आहे. गाळ काढण्याच्या शासनाच्या मोहिमेलाही चांगला प्रतिसाद लाभला असून ९.२ कोटी घनमीटर गाळ यावर्षी काढला गेला आहे. यामुळे धरणात ४७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. पाणलोटक्षेत्राच्या बाबतीत २००५ ते २०१४ या कालावधीत १२३७ हेक्टर पाणलोट क्षेत्र होते, मात्र २०१४ ते २०१८ या कालावधीत हे क्षेत्र ५६७० हेक्टर इतके झाले आहे. आरोग्य, रोजगार, सार्वजनिक बांधकाम अशा क्षेत्रांत सरकारने केलेल्या कामांची आकडेवार माहिती मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने पत्रकारांसमोर मांडली. कुपोषणग्रस्त बालकांच्या संख्येत झालेली घट हीदेखील जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जलयुक्त शिवार

 
 एकूण गावे १६,५२२
 एकूण कामे ,५७,३८६
 निर्मित पाणीसाठी २४,०५,५०२ टीसीएम
 निर्मित सिंचन क्षमता ३४,२३,३१६ हेक्टर
 एकूण निधी खर्च ७६९२ कोटी
 लोकसहभाग ६३८ कोटी
 लोकसहभागातून झालेली कामे १०,६९४
 परिणामी उत्पादकतेत वाढ ४५ टक्के

 

विकासाच्या संदर्भातील प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी तडाखेबंद उत्तरे तर दिलीच पण त्याचबरोबर भीमा-कोरेगावसारख्या प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले की, “अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच मात्र आपल्या अभिव्यक्तीमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर त्याकडे आपण गांभीर्यानेच पाहिले पाहिजे. यातून जे काही घडेल, त्याला कायद्याच्या चौकटीतूनच तपासले पाहिजे. सध्या जे काही चालू आहे, ते अशाच स्वरूपाचे आहे. कायद्याच्या चौकटीतून कुणीही सुटू शकणार नाही,” असा इशाराच त्यांनी दिला. राजकीय प्रश्नांवरही त्यांनी खुसखुशीतपणे उत्तरे दिली. राम मंदिराच्या प्रश्नात शिवसेना उतरली असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सरळ याचा हिंदुत्वाला उपयोगच होईल, असे म्हटले. “राम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यांत जे लोक या प्रश्नी समोर येतील त्यांचे स्वागतच केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मुख्यमंत्री आश्वस्त असल्याचे चित्रच सगळ्यांना पाहायला मिळाले. लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आपल्यासोबतच असेल, असेही सूतोवाच त्यांनी केले.
 

शेतीवर दुप्पट खर्च

 

२००९-२०१४ : १३ हजार, ७०० कोटी (५ वर्ष)

वार्षिक सरासरी : २७४० कोटी

२०१४-२०१८ : २२ हजार,१९९ कोटी (४ वर्ष)

वार्षिक सरासरी : ५५५० कोटी

 

शेतीत पायाभूत सुविधा/सिंचन सोयींच्या

उपलब्धींमुळे उत्पादनात वाढ

 

वर्ष पर्जन्यमान उत्पादन

२०१३-१४ १२४ टक्के १३७.९१ लाख मेट्रिक टन

२०१६-१७ ९५ टक्के २२३ लाख मेट्रिक टन

२०१७-१८ ८४ टक्के १८० लाख मेट्रिक टन

 

स्टार्टअप योजना

 

देशात एकूण स्टार्टअप : १० हजार,९५०, महाराष्ट्रात सर्वाधिक

महाराष्ट्र : २१३० स्टार्टअप/गुंतवणूक : २००.९६ कोटी रुपये

कर्नाटक : १६११ स्टार्टअप/गुंतवणूक : १९०.०२ कोटी रुपये

दिल्ली : १४८५ स्टार्टअप/गुंतवणूक : ५१.३२ कोटी रुपये

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@