विंडीजविरुद्ध भारताने रचला धावांचा डोंगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |



मुंबई: तिसरा सामना टाय केल्यानंतर सगळ्यांचे लक्ष लागले आहेत ते मुंबईत चालू असलेल्या चौथ्या सामान्याकडे. नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करताना भारताने ५ विकेट गमावून ३७७ धावांचा डोंगर रचला आहे. यामध्ये रोहित शर्माच्या १६२ धावा (१३७ चेंडू) आणि अंबाती रायडूच्या १०० धावा (८१ चेंडू) मोठा वाटा आहे. तिसऱ्या विकेटसाठी त्या दोघांनी २११ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. वेस्ट इंडिजला आता विजयासाठी ३७८ धावांचे कडवे आव्हान असणार आहे. रोहितने २१वे तर रायडूने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतले २रे शतक साजरे केले.

 

रोहित- शिखर यांच्या नावावर अजून एक विक्रम

 

मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर हा सामना चालू आहे. या सामान्यांमध्येही अनेक विक्रम मोडीत निघाले. रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर एक नवीन विक्रमाची नोंद केली. एकदिवसीय क्रिकेट विश्वात भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांच्या यादीत रोहित आणि शिखर ही सलामी जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर जागतिक स्तरावर त्यांनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामीजोडीचा विक्रम मोडीस काढला आहे. सचिन आणि सेहवाग जोडीने २००२ ते २०१२ या कालावधीत ९३ वनडे सामन्यांमध्ये ४२.१३ च्या सरासरीने सलामी करताना ३९१९ धावा केल्या होत्या. यात १२ शतकी आणि १८ अर्धशतकी भागीदाऱ्यांचा समावेश आहे. रोहित-शिखर जोडीने अवघ्या ८७ इनिंगमध्ये ३९२० धावा करून सचिन-सेहवागला मागे टाकले.

 

रोहित शर्माचे २१वे शतक

 

रोहित शर्माने २१वे एकदिवसीय शतक साजरे केले. यासोबतच त्याने ६व्यांदा १५०पेक्षा जास्त धाव केल्या आहेत. १६२ धावांच्या खेळीमध्ये त्याने २० चौकार आणि ४ शतकारांचा समावेश आहे. रोहित शर्माने ४ षटकार लगावत सचिन तेंडुलकरच्या १९५ एकदिवसीय शतकारांचा विक्रमही मोडला आहे. आता रोहितच्या नावावर १९८ षटकार जमा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@