मराठा समाजाला विरोधकांनी झुलवत ठेवले : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |
 
 

कराड : मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने झुलवत ठेवले. २०१४मध्ये कॉंग्रेस सरकारने कायदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो टिकला नाही. भाजप सरकार आल्यावर आम्हीही कायदा केला मात्र, त्यावरही स्थगिती आणण्यात आली. दरम्यान, सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन केला आहे. त्या आयोगाचा अहवाल १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत येईल. त्यानंतर अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात कायदा आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

 

कराड तालुक्यातील सैदापुर येथे मराठा समाजातील मुलींच्या वसतीगृहाच्या उदघाटन कार्यक्रमाला ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.

 

चंद्रकांतदादा म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणासाठी राज्यात ५८ मोर्चे निघाले. जगाच्या इतिहासात त्या मोर्चांची नोंद होईल. मराठा समाजाला आरक्षण हा मुद्दा दोन वर्षात आला नाही. १९६८पासून मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. १९८०मध्ये आण्णासाहेब पाटील यांनी त्यासाठी मुंबईत मोठा मोर्चा काढला. त्यांनी आरक्षण दिले नाही तर स्वतःला जीवंत ठेवणार नाही असे म्हणुन स्वतःला गोळी झाडुन आत्महत्या केली. १९८२मध्ये ही चळवळ शिथील झाली. त्यानंतर आरक्षण देऊ असे सांगुण त्या-त्या सरकाने झुलवत ठेवले. मात्र सरकारने आरक्षण देवुन ते टिकणार नव्हते. त्यासाठी मागास आयोगाने हा समाज मागास आहे असे सांगणे आवश्यक होते. त्या-त्या वेळच्या मागास आयोगाने म्हंटले नाही. त्यामुळे आरक्षण मिळण्यात अडचणी येत होत्या. सरकाने मागासवर्गीय आयोग स्थापन केला. त्या आयोगाचा अहवाल १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान येईल. त्यानंतर लगेचच अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात कायदा करुन कायमचे टिकाणारे आरक्षण सरकार देणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@