सलमान खानला सतावतेय ‘ही’ चिंता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या चिंतेत आहे. आपल्या लाडक्या भाईजानला कसली चिंता सतावतेय? या गोष्टीची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. सध्या सलमान ‘बिग बॉस’ च्या १२ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यात व्यस्त आहे. तसेच त्याच्या बहुचर्चित ‘भारत’या सिनेमाचे चित्रिकरणदेखील एकीकडे सुरू आहे. कामाचा व्याप तर सलमानला आहेच पण त्याला मात्र एक वेगळीच चिंता सतावत आहे.
 

‘भारत’ या सिनेमाच्या वाढत्या लांबीमुळे सलमान खानला टेन्शन आले आहे. सिनेमाची लांबी ही जास्तीत जास्त पावणे तीन तासांची असावी. असे सलमानला वाटते. परंतु हा सिनेमा ३ तासांच्या वर जाईल. असे दिग्दर्शक अली अब्बास जफरचे म्हणणे आहे. सिनेमाच्या कथानकाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करायला दिग्दर्शक तयार नाही. त्यामुळे सिनेमा लांबलचक झाला तर प्रेक्षक कंटाळतील, सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. ही भीती सलमानला वाटत आहे. आता सलमान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर याबाबतीत काय तोडगा काढणार? हे पाहण्याजोगे असेल.

 

 
 

‘भारत’ हा सिनेमा ‘ऑड टू माय फादर’ या कोरियन सिनेमाचा हिंदीतील रिमेक आहे.या सिनेमात अभिनेता सलमान खानची ‘भारत’ ही व्यक्तिरेखा २० ते ६० या वयोगटातील अनेक टप्प्यांमध्ये दिसेल. त्यानिमित्ताने सलमान खानचे वेगवेगळे लूक्स त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. सूत्रांनुसार असे कळते की सिनेमाची कथा ही १९४७ सालची भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील आहे. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची ही कथा आहे. “मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील” असे वचन भारतचे वडील फाळणीच्या वेळी स्थलांतर करताना भारतकडून घेतात. कथानकाच्या गरजेनुसार भारतचा ५० वर्षांचा जीवनप्रवास या सिनेमात दाखविला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक १० वर्षांनी सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना दिसतील. यातील एक लूक मॉडर्न असणार आहे. त्या काळात अभिनेत्री कतरिनाशी त्याचे प्रेम होते आणि नंतर ते दोघे लग्न करतात अशी कथा आहे. भारत सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान-कतरिना ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘टाइगर जिंदा है’ हा सलमान कतरिनाने केलेला शेवटचा सिनेमा होता. तसेच भारतच्या कथेत सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीमध्ये काम करावे लागते. असेही दाखविण्यात आले आहे. या दरम्यान तो मौत का कुँआ मध्ये खतरनाक स्टंटबाजी करताना दिसेल. अभिनेत्री दिशा पटानी ही या काळात त्याच्यासोबत दाखवली आहे. दिशाने या सिनेमात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. सध्या अबुधाबी, माल्टा या देशांतील सुंदर लोकेशन्सवर या सिनेमाचे चित्रिकरण सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@