फरार सभापती बंटी ठाकूरला अटक कराभाजपा युवा मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर ‘जोडे मारो’ आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |
 
 
 
फरार सभापती बंटी ठाकूरला अटक करा

भाजपा युवा मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर ‘जोडे मारो’ आंदोलन


चाळीसगाव, २७ ऑक्टोबर
 
येथील ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नगरपालिकेचा शिक्षण सभापती बंटी ठाकूर याला बडतर्फ करण्यात यावे तसेच शिक्षकी पेशाला काळिमा फासणार्या ठाकूर या नराधमाला अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चातर्फे २७ शनिवार, रोजी तहसील कार्यालयासमोर बंटी ठाकूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आले.
यावेळी नगरसेवक बंटी ठाकूरच्या प्रतिमेला महिला नगरसेविका यांनी जोडे मारून निषेध नोंदवला. तर युवा मोर्चा आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बंटी ठाकूरच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
 
 
यावेळी आंदोलनाला उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते यू.डी. माळी, नगरसेवक चंदू तायडे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेविका विजया भिकन पवार, नगरसेवक नितीन पाटील, मानसिंग राजपूत, गणेश महाले, बापू अहिरे, सोनाली विकास गुरव, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, पं.स. सदस्य सुनील पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस अमोल चव्हाण, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, उपाध्यक्ष कपिल पाटील, अनुसूचित जाती आघाडीचे स्वप्निल मोरे, अल्पसंख्याक आघाडीचे बबडी शेख, शुभम पाटील, राकेश बोरसे, खुशाल पाटील, प्रवीण पाटील, सचिन दायमा, किशोर गवळी, अनिल गोत्रे, भरत गोरे, कैलास गावडे, राहुल स्वार, शिवाजी मराठे, राहुल पाटील, ज्ञानेश्वर साबळे, शिवराज पाटील, गणेश चौधरी, सुनील रणदिवे, विशाल कारडा, अजय करनकाळ कल्पेश पाटील भोजराज खैरे, सोनू अहिरे, बाजीराव अहिरे, वाल्मीक महाले, सौरभ पाटील यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी शाळेला भेट देवून मुख्याध्यापकांची चांगलीच कान उघाडणी केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@