जामनेरात अभाविपच्या मागणीला यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |

जामनेरात अभाविपच्या मागणीला यश

जामनेर, २७ ऑक्टोबर
तालुकाभरातून शिक्षण घेण्यासाठी येत असणार्‍या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जामनेरच्या वतीने वेळोवेळी निवेदन दिली होती. परंतु, मागणी मान्य न झाल्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी ग. द. म महाविद्यालयात पिण्याच्या पाण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. अखेर ती मागणी महाविद्यालय प्रशासनाने मान्य केली असून फिल्टर चालू करण्यात आले. त्यावेळी फिल्टर प्लांटची पाहणी करण्यात आली. तो चालू करण्यात आला. त्यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र पाटील, सहसचिव शिवाजी सोनार, प्राचार्य व्ही.व्ही.भास्कर, किरण पाटील, शहरमंत्री अक्षय जाधव, तालुका प्रमुख मनोज जंजाळ, शुभम मोरे, आकाश पंडित उपस्थित होते. जाताऐसोचे अध्यक्ष, सहसचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी फिल्टर प्लांटचे पूजन करून तो चालू करण्यात आला.
त्यावेळी महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अध्यक्ष व सचिव जितेंद्र पाटील सहसचिव यांचा सत्कार करण्यात आला.

 
 
@@AUTHORINFO_V1@@