सिंधी समाजातर्फे विश्वशांतीसाठी महायज्ञवर्सी महोत्सवास देशभरातील भाविकांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |
 



सिंधी समाजातर्फे विश्वशांतीसाठी महायज्ञ

वर्सी महोत्सवास देशभरातील भाविकांची उपस्थिती


जळगाव, २७ ऑक्टोबर
विश्वात सुख-शांती नांदावी, प्रत्येक कुटुंबात अन्नधान्याची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना सिंधी समाजबांधवांनी वर्सी महोत्सवानिमित्त केली. वर्सी महोत्सवानिमित्त आर्य समाज मंडळ, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोपचाराने शनिवारी सकाळी महायज्ञ करण्यात आले. संत गेलाराम साहेब यांचे शिष्य देवीदास भाई यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. यावेळी देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
दरवर्षी सिंधी कॉलनी सेवा मंडल येथे अमर शहीद संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब (गोदडीवाले बाबा), ब्रह्मस्वरूप बाबा गेलाराम साहेब यांचा वर्सी महोत्सव साजरा केला जातो. अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य सिंधी पंचायततर्फे वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी ५ वाजता संत गेलाराम साहेब यांच्या समाधीला पंचामृताने स्नान करून झाली.
शनिवारी सकाळी ९ वाजता महायज्ञात दहा दाम्पत्यांनी पूजा केली. तद्नंतर सेवामंडळ कार्यालयाचे उद्घाटन देवीदास भाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संत कंवरराम ट्रस्टचे रमेश मतानी, विजय दारा, अशोक मतलाणी, सतीश मताणी, कृष्णानंद कुकरेजा, नंदलाल कुकरेजा, विशनदास मताणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी ७ वाजता अखंड पाठसाहेब आणि अखंड भूमी साहेब यांचे कार्य संपन्न झाले. राजेश कुमार, अमरावती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मंदिराचे नवनिर्माण कार्य सुरू असल्याने भाविकांची राहण्याची व्यवस्था संत हरदास समाज मंदिर, केमिस्ट भवन, परिसरातील समाजबांधवांच्या निवासस्थानी केली आहे. रविवार, २८ रोजी सकाळी ११ वाजता झेंडापूजन होऊन विविध कार्यक्रमाला सुरुवात होईल.

सिंधी सेंट्रल पंचायततर्फे वर्सी महोत्सवानिमित्त रक्तदान, अवयवदान शिबीर


वर्सी महोत्सवानिमित्त संत बाबा हरदासराम समज मंदिर येथे २८ व २९ ऑक्टोबरला महारक्तदान आणि अवयवदान शिबीर होणार आहे, अशी माहिती पूज्य सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष मुकेश टेकवाणी यांनी दिली.
वर्सी महोत्सवानिमित्त देशातून तसेच जगभरातून हजारो लोक येणार आहेत. रक्तदान शिबिरात ना.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, आ.चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी आ. गुरुमुख जगवाणी, केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, अशोक जैन आदी उपस्थित राहणार आहे. शिबिरात ५०० पिशव्यांचे रक्त संकलन करण्याचा संकल्प अध्यक्ष टेकवाणी यांनी केला आहे.
शिबिरासाठी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, माधवराज गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, रेड क्रॉस ब्लड बँक व सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेचे सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमांतर्गत एक हजार रक्तदात्यांची यादी संस्थेकडे उपलब्ध राहणार असून, ती २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे डॉ. रवी हिराणी यांनी सांगितले.

सांगतानिमित्त समाजबांधव करणार सेवा
वर्सी महोत्सवाची २९ रोजी सांगता होणार आहे. त्यानिमित्त शहरातील समाजबांधव आपला व्यवसाय बंद करून आलेल्या भाविकांची सेवा करणार आहे. सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांसाठी जळगाव रेल्वेस्थानकावर समाजबांधवांतर्फे समाज मंदिरापर्यंत येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे. निकदास तेजवाणी यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@