जळगावातील समांतर रस्त्याच्या कामासाठीमहापौरांनी घेतली ना.गडकरींची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |
 
जळगावातील समांतर रस्त्याच्या कामासाठी
महापौरांनी घेतली ना.गडकरींची भेट
 
जळगाव, २७ ऑक्टोबर
जळगाव शहरात मंजूर झालेल्या समांतर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी महापौर सीमा भोळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून केली.
 
नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र महापौर परिषदेत सीमा भोळे सहभागी झाल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. शहरातील विकासप्रकल्प तातडीने मार्गी लावण्याबाबत सहकार्य करावे, अशी विनंत केली. हुडको कर्ज माफी, रस्ते दुरुस्तीसाठी निधी, मनपा शिक्षण विभागाच्या अडचणी, भुयारी गटारी, पंतप्रधान आवास योजना, वीज दिव्यांसाठी निधी, श्‍वान निर्बीजीकरण व डॉग व्हॅनसाठी निधी, रिक्त पदांवर नियुक्ती, मलःनिस्सारण योजना, फेरीवाला धोरण, घनकचरा प्रकल्प उभारणी आदींबाबत निवेदन सादर केले. ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन जळगाव शहरासाठी मंजूर झालेल्या समांतर रस्त्याचे काम लवकर होण्यासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी चर्चेदरम्यान महापौर सीमा भोळे यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@