सूर्याचे भ्रमण अन् राशिचक्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018   
Total Views |



Symbolism हे एक फार व्यापक शास्त्र आणि ज्ञानशाखा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic हा शब्द, व्यक्त करण्याची निव्वळ एक प्रणाली आहे. Symbolism ही एक प्रगत निश्चित लिखित संकल्पना आहे. मात्र, अभ्यास करूनच त्याचा परिचय करून घेत येतो.


इजिप्त या प्राचीन देशातील व्यापक अशा चिह्नसंस्कृतीचा परिचय करून घेताना या दोन इंग्रजी शब्दांचा परिचय आणि त्यातील सूक्ष्म फरक समजून घेणे आवश्यक आहे. ‘Symbolism’ म्हणजे चिह्नशास्त्र किंवा प्रतीकशास्त्र. हा शब्द एक नाम (noun) किंवा संज्ञा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic म्हणजेच प्रतीकात्मक, द्योतक, सूचक, लाक्षणिक या संदर्भाने वापरला जाणारा हा शब्द त्या नामाचे वर्णन करणारे विशेषण आहे. Symbolism हे एक फार व्यापक शास्त्र आणि ज्ञानशाखा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic हा शब्द, व्यक्त करण्याची निव्वळ एक प्रणाली आहे. Symbolism ही एक प्रगत निश्चित लिखित संकल्पना आहे. मात्र, अभ्यास करूनच त्याचा परिचय करून घेत येतो. Symbolic रचना नेहमीच चिह्न-प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त होते, जी आपल्याला Symbolismच्या मूळ संकल्पनेपर्यंत घेऊन जाते. प्राचीन काळापासून प्रचलित जगभरातील उपासना-आराधना संस्कृतींच्या पद्धतींचा आणि त्यासाठी नियुक्त देव-देवता आणि चिह्न-प्रतीकांचा इतिहास आणि त्याचे संदर्भ खूप व्यापक आणि रंजक आहेत. सूर्य या ताऱ्याची देवता म्हणून निवड का झाली असेल, कशी झाली असेल, त्याचे चिह्न सतत समोर ठेऊन व्यक्ती आणि समाजाला नक्की काय साध्य झाले असेल, असे प्रश्न आपल्यासमोर आहेत. आता उपलब्ध झालेल्या प्राचीन संहिता आणि नोंदींवरून आपण या प्रश्नाचा वेध घेऊया. रोज उगवतो, प्रकाश आणि ऊब देतो म्हणून हाच आपला देव असे काहीही झालेले नाही. एकेकाळी आपल्यावर राज्य केलेला राजा अथवा आपल्या देशातील एखाद्या महाकाव्याचा हा कोणी नायकही नाही.

 

या सूर्यदेवाचा महिमा सारांशाने आणि अगदी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला मांडायचा आहेच. निरंतर अव्याहत निसर्गचक्र आणि त्या लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात पृथ्वीवरच्या विषम वातावरणाशी जुळवून घेताना विकसित झालेल्या मानवाच्या आत्मिक-लौकिक-मानसिक-तर्कसंगत अशा संपन्न अनुभूतीचा अंतिम उद्गार म्हणजे सूर्यदेवता. उत्क्रांतीच्या काळात मानवाच्या अनेक पिढ्यांनी आत्मसात केलेले भौतिक तंत्र, अनेक पिढ्यांच्या अनुभवातून त्याच्या मनात निर्माण झालेले आदर्श, स्वतःचे अपूर्व आणि दैवी स्वरूपाचे अव्यक्त बुद्धी सामर्थ्य या सर्वाची जाणीव पुढील पिढ्यांसाठी परावर्तीत करण्याची चतुर मांडणी म्हणजे सूर्यदेवता आणि तिच्या उपासना-आराधना संकल्पनांची रचना. चिह्न- प्रतीकांच्या व्यक्त रचनेतून सूर्यदेवतेच्या मूळ संकल्पनेची दृश्य स्वरूपात केलेली निर्मिती हे सगळे व्यापक काम काही शतके सुरू असलेल्या मांडणीतून झाले असावे हे नक्की. प्राचीन इजिप्तच्या ख्रिस्तपूर्व साधारण तीन हजार वर्षांचा सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास फार गुंतागुंतीचा आणि अद्भूत आहे. या वरील पाचही गोष्टी या इतिहासात एकमेकांशी व्यक्त आणि अव्यक्त माध्यमातून जोडलेल्या आहेत. पिढ्यानपिढ्या प्रगत होणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना, स्वत:च्या अव्यक्त मन:शक्तीचा, बुद्धीचा आणि शरीरक्षमतेचा परिचय करून देणारा आरसा असेच या सूर्यदेवतेच्या उपासनेचे आणि त्यासाठी नियुक्तचिह्न-प्रतीकांचे वर्णन करावे लागेल. कारण, सूर्यदेवतेची अनेक चिह्ने हे यांचे एकमेव व्यक्त रूप आहे.

 

सूर्यदेवाची आराधना आणि उपासना नेहमीच अस्सल, प्रामाणिक अशा भावनेने आणि उदात्त, उत्तुंग, उन्नत अशा स्वरूपात स्वीकारली गेली आणि तशीच सादरसुद्धा केली गेली. या आराधना-उपासनेचे दैनंदिन अथवा प्रासंगिक समारंभ नेहमीच भव्य होते आणि प्रत्येक राजा आणि प्रजेसाठी गौरवशालीसुद्धा होते. प्रत्येक स्त्री आणि पुरुष आपल्या जीवनकाळात दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला आणि प्रत्येक वर्षी, बदलणाऱ्या सूर्याच्या कलांचा आणि बदलणाऱ्या निसर्गाचा अनुभव घेत होतेच. वर्षभराच्या प्रवासात सूर्यदेवासह १२ राशींमधून होणारा त्याचा प्रवास आणि त्यातील नेमाने येणाऱ्या निसर्गातील बदलांच्या प्रत्येकाने घेतलेल्या अनुभवला आपल्या वैयक्तिक अनुभवाशी ताडून पाहिले जात होते. सूर्यदेवाच्या वार्षिक भ्रमणकाळात तो दर महिन्याला एक असा १२ राशीतून प्रवास करतो, अशी मांडणी तत्कालीन इजिप्शियन वैज्ञानिकांनी केली होती. त्या प्रत्येक राशीला स्वतःचे विशेष चिह्न-प्रतीक नेमून दिले गेले होते आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि स्वभावधर्म माणसाच्या शरीर-मन-आत्मा आणि त्याबरोबरच भूत -वर्तमान आणि भविष्यकाळ यांच्याशी जोडले गेले होते. सूर्यदेवासह त्याच्या वार्षिक भ्रमणकाळात येणाऱ्या राशी, त्यांची चिह्नं आणि राशिसंस्कृती प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनली यात नवल ते काय!

 

सगुण-साकार भूतकाळ आणि प्रत्यक्षात अनुभवता येणारा वर्तमानकाळ यापेक्षाही प्रत्येक मानवाला नेहमीच निर्गुण-निराकार-अदृश्य भविष्याचे आकर्षण राहिले आहे. आपले दैनंदिन जीवन, घटना कोण आणि कसे नियंत्रित करतो, कोण घडवतो याचे औत्सुक्य आणि ते बदलता येईल का, अशा अपेक्षेत आणि प्रयत्नात प्रत्येकजण राहिला आहे. सूर्य अमुक राशीत आला तेव्हा माझ्या जीवनात छान काही घडले पण, तो तमुक राशीत गेल्यावर मात्र मला फार नुकसान सोसावे लागले होते, अशी स्वानुभवावर आधारित गणिते सूर्यदेवाच्या वार्षिक, मासिक, साप्ताहिक, दैनंदिन भ्रमंतीवर मांडली जाऊ लागली असावीत. शेतीउत्पन्न, जन्म, मृत्यू, प्रगती, प्रवास अशा अनेक गोष्टी आणि वैयक्तिक-सामाजिक-राजकीय घटनांवर वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यदेव प्रभाव टाकू लागला असावा. भौतिकवास्तव जगातील आपल्या नाशीवंत शरीराला मृत्यू निश्चित आहे, याची निश्चित जाणीव असलेले मानवाचे सजग मन, सूर्यदेवाच्या दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, वार्षिक आवर्तनातून आत्मिक सत्य म्हणजे प्राप्त झालेल्या मानवी जीवनाचा योग्य अर्थ आणि निश्चित प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न करत होते. सूर्यदेवाची उपासना-आराधना म्हणजेच आपल्यातील ईश्वरीय आणि दैवी अंश शोधण्याचा प्रयत्न... अशा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा प्रत्येक उपासक भक्तिभावाने धारण करीत होता. या प्रगतीसाठी लिखित काव्य, साहित्य, चित्रकला, शिल्प, मूर्ती अशा विविध व्यक्त माध्यमांतून उपासनेच्या विशिष्ट संकल्पनांसाठी (Symbolism) विशिष्ट संकेत योजना, वेगवेगळ्या चिह्न-प्रतीकांतून (Symbolic) रचल्या गेल्या. यातील ‘रे’ म्हणजे सूर्यकिरण या अर्थाचा हा शब्द याच अर्थाने वैश्विक शब्द आणि संज्ञा म्हणून स्वीकारला गेला. यातील राशिचिह्न आणि राशिसंस्कृती या संकल्पनांना आदिम मानवाच्या खुळचट अंधश्रद्धा आणि काल्पनिक कथा म्हणून एकावेळी हिणवले गेले होते.

 

आज वैश्विक स्वीकृती प्राप्त झालेल्या या राशिचिह्न आणि राशिसंस्कृती, विशिष्ट वैज्ञानिक समन्वय असलेली रचना आहे हे आज जगन्मान्य शास्त्र आहे. मूळ इजिप्शियन संस्कृतीत प्रगत झालेली ४८ नक्षत्रे, १२ राशी यांचा आकाशाचा नकाशा नंतरच्या काळात प्रथम मेसापोटेमिया आणि मग बॅबिलोनिया या प्रदेशातील संस्कृतींमध्ये स्वीकारला गेला आणि कालांतराने तो ग्रीक राशिचक्र म्हणून जगप्रसिद्ध झाला. पृथ्वीच्या गोलार्धावरील काल्पनिक उभ्या आणि आडव्या अक्षांश-रेखांश ही संकल्पना एखाद्या ठिकाणाची पृथ्वीवरील जागा निश्चित करण्यासाठी वापरली जाणारी विशिष्ट वैज्ञानिक समन्वय असलेली रचना आहे. सूर्याचे दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, वार्षिक भ्रमणाची नोंद घेण्याचे अगदी त्याच स्वरूपाचे काम आकाशातील नक्षत्र आणि राशिमालेच्या नकाशाने साध्य होते. इजिप्शियन विद्वानांनी १२ राशींना चिह्न आणि नावे दिली. त्याबरोबरच बाकीच्या नक्षत्रांना प्राण्यांची चिह्नं आणि प्रतीके नेमून दिली. यामुळे रात्रीच्या अंधारात नुसत्या डोळ्यांनी या नक्षत्रांचे दर्शन घेता येतेच. मात्र, त्यांच्या चिह्न-प्रतीकांमुळे ती ओळखण्यास कुठलेही यंत्र लागत नाही. सूर्यदेवाच्या अशा अनोख्या चिह्नसंस्कृतीबरोबरच इजिप्शियन संस्कृतीतील प्राणी आणि पक्षी यांची चिह्न, त्याचे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ यांच्या रंजक आणि तर्कसंगत भाषेचा परिचय पुढील लेखांत वाचकांना करून देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


pasting
@@AUTHORINFO_V1@@