ग्रामीण बचतगटांच्या महिला निघाल्या अमेरिकेला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |



महिलांनी उत्पादित वस्तुंचे अमेरीकेत प्रदर्शन होणार


मुंबई : ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेले उत्पादने आता सातासमुद्रापलीकडे जाणार आहेत. ग्रामीण बचतगटांच्या महिलांनी उत्पादित वस्तुंचे अमेरीकेत प्रदर्शन होणार आहे. यामध्ये वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) मार्फत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचतगटांच्या महिलांचा समूह अमेरीकेला चालला असून या महिला तेथील एमआयटी, स्टँडफोर्ट विद्यापीठ, टीआयई चार्टर, फेसबुकसारख्या विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील उद्योजकतेचीही माहिती घेणार आहेत. तसेच अमेरीकेतील बोस्टन, न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे.

 

"राज्यातील बचतगटाची चळवळ ही आता फक्त बचतीपुरती मर्यादित राहिली नसून या चळवळीतून अनेक महिला लघुउद्योजक पुढे येत आहेत. अनेक महिला बचतगट वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग यशस्वीरीत्या चालवित आहेत. त्यापैकी १०० बचतगटांच्या उद्योजकतेला आम्ही महाअस्मिता नाविन्यपूर्ण उपजिविकी गतीवर्धन कार्यक्रमातून (मीलाप) चालना देत आहोत. या लघुउद्योजक महिला बचतगटांना उद्योजकतेचे आधुनिक प्रशिक्षण देणे, त्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेची माहिती करुन देणे अशी काही मीलाप अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत." असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@