स्पेशल ट्रीटमेंट भोवली ; पाच पोलीस निलंबित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |


 


ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला तुरुंगात विशेष वागणूक दिल्याप्रकरणी पाच पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश असून ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर फणसाळकर यांनी कारवाई केली.

 

काय आहे प्रकरण

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. ठाणे मध्यवर्ती कारागृहामधून कासकरला ठाणे सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. यादरम्यान, कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कासकरला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी उपनिरीक्षक रोहिदास पवार याच्यावर होती त्यावेळीच हा प्रकार घडल्याने पवार व त्यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@