कोंबड्यांच्या वाहतूकीसाठी नियम हवे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |


 

मुंबई : मुंबईत विक्रीसाठी कोंबड्या घेऊन येणाऱ्या वाहनांमध्ये अस्वच्छता असते, त्यामधून दुर्गंधी येते. यामुळे बर्ड फ्लु सारखे आजार पसरण्याचा धोका असून कोंबड्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांबद्दल काही नियम करावेत, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

 

गंगाधरे यांनी म्हटले आहे की, जी वाहने कोंबड्या विक्रिसाठी मुंबईत येतात. त्या वाहनांचे वाहनधारक या वाहनांची स्वच्छता ठेवत नाहीत. या वाहनात दररोज कोंबड्याची विष्ठा जमा होते. त्यामुळे जेथे वाहन जाते तेथे दुर्गंधी सुटते. या दुर्गंधीमुळे रोगराई पसरल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत त्यामुळे कोंबड्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांबद्दल काही नियम करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@