‘पाक’ने सिद्ध केले ना'पाक' इरादे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |


 


इस्लामाबाद: निवडणुकीपूर्वी दहशतवाद मुळासकट उपटून टाकू अशी भाषा करणाऱ्या इम्रान खान यांनी सत्तेवर येताच दहशतवादी विचारांना चालना देणारा निर्णय घेतला आहे. इमरान सरकारने मुंबईतील २६/११चा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दावा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वरील बंदी हटवली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी अध्यादेश जारी करून हाफिजच्या संघटनांवर बंदी आणली होती. हुसैन यांनी अध्यादेश काढून संयुक्त राष्ट संघाच्या सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीत समावेश असलेल्या हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दावा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वर बंदी घातली होती.

 

या बंदीविरोधात हाफिज सईदने इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली होती. पाकिस्तानमधील तहरीक-ए-इन्साफ सरकारने या अध्यादेशावर कारवाई केली नाही.त्याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हा अध्यादेश अवैध असल्याचे हाफिजचे वकील रिजवान अब्बासी आणि सोहेल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. हा अध्यादेश पाकिस्तानची एकात्मता आणि संविधानाच्या विरोधी असल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते. हा अध्यादेश सध्याच्या सरकारने पुढे आणलाच नाही. त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी तो संसदेसमोरही ठेवला नाही, असेही हाफिजच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@