विंडीजचा 'चॅम्पियन' ब्रावोची निवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे ब्रावो वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे वेस्ट इंडिजचे चाहते मात्र पुरते नाराज झाले आहेत. यापुढे तो फक्त व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे ब्राव्हो आता आयपीएलसारख्या टी-२० लीग स्पर्धांमध्येच खेळताना दिसेल. ड्वेन ब्राव्होने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजकडून ४० कसोटी सामने, १६४ एकदिवसीय सामने आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत. ३५ वर्षीय ड्वेन ब्राव्होने निवृत्तीसंदर्भात एक पत्रक जरी केले. ब्राव्होने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. २०१६ सालच्या टी-२० विश्वविजेत्या संघात ब्राव्होचे मोलाचे योगदान होते.

 

"आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे. गेली १४ वर्ष वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. २००४ साली इंग्लंडच्या लॉर्ड्सवर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे. तेव्हाचा उत्साह आणि प्रेम संपूर्ण कारकिर्दीमध्ये माझ्यासोबत कायम होता. पुढे तरुणांना संधी मिळावी आणि देशाचा खेळ उत्तम व्हावा म्हणून मी ही निवृत्ती घेत आहे. ऑन आणि ऑफ फिल्ड माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व चाहत्यांना मनापासून धन्यवाद. माझ्या कारकिर्दीमध्ये मी जगभरातील क्रिकेट मैदानांवरील ड्रेसिंग रुम्स या खेळातील दिग्गजांबरोबर शेअर करु शकलो यासाठी स्वत:ला नशिबवान समजतो. तसेच या पुढे मी व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून माझी कारकीर्द सुरूच ठेवेन आणि खऱ्या चॅम्पियनप्रमाणे चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन." अश्या भावना त्याने पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.

 
 
 ड्वेन ब्रावोची कारकीर्द (वेस्ट इंडिजकडून खेळताना)
 
  सामने धावा सरासरी बळी
 कसोटी ४० २२०० ३१.४२ ८६
 एकदिवसीय १६४ २,९६८ २५.३६ १९९
 टी२० ६६ १,१४२ २४.२९ ५२
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@